बहुजननामा ऑनलाइन – बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह चौघांना 72 तासांत न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली. खंडणी व फसवणूक प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दिलेल्या जामिनावर पोलिस आणि सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. त्या अपिलात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी हा आदेश निकाल दिला.
देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने जामिनाचा आदेश बरखास्त करीत 72 तासांत आरोपींनी न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश बुधवारी दिली आहेत. फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या 17 लाखांपैकी किती रक्कम या चार आरोपींना मिळाली, आरोपींनी औंधमधील एका प्लॉटचे खोटी कागदपत्रे कुठे बनवली, गुन्ह्यांचा कट कुठे रचला, त्यात कोणाचा काय सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.