पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे ग्रामीण पोलिस दलातुन नव्याने पुणे शहर पोलिस दलात समाविष्ट झालेल्या लोणीकंद पोलिस स्टेशनला पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपआयुक्त पंकज देशमुख ,ट्रॅफिक वाहतूक विभाग राहुल श्रीरामे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव ,मोटार परिवहन विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त आबासाहेब चिमटे’पुणे ग्रामीण अप्पर पोलीस आयुक्त विवेक पाटील,हवेली
उपविभागीय डॉ. सई भोरे पाटील,लोणिकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर ,पोलिस निरीक्षक विनायक वेताळ आदि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुणे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत शहर पोलीस प्रमाणे सर्व प्रकारचे पोलीसीग उपलब्ध होणार आहे. पुढील काही दिवसात ही सर्व यंञणा सुरळीत केली जाईल.