पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Aircraft Accident | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) कडबनवाडी परिसरातील शेतात कार्व्हर एव्हिएशन (Carver Aviation Baramati) चे विमान कोसळले. या अपघातात महिला पायलट भावना राठोड (Female Pilot Bhavna Rathore) किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिले जाते. आज (सोमवार) सकाळी विमानाने बारामतीमधून उड्डाण केल्यानंतर हे विमान खाली (Pune Aircraft Accident) कोसळले.
आज सकाळी 11:20 ते 11:30 वाजेदरम्यान कार्व्हर एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भावना राठोड (वय -22 रा. पुणे) किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कार्व्हर एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले असून
यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भावना राहुल राठोड या किरकोळ जखमी झाले असून
त्यांना औषध उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
इतर कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. घटनास्थळी करवार एव्हिएशन बारामती यांचे अधिकारी हजर आहेत.
हे विमान इंधन संपल्यामुळे कोसळल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.
Web Title :- Pune Aircraft Accident | training plane crashed in a field in a village in indapur pune aircraft accident news
हे देखील वाचा :
Hair Care Tips | तुम्ही सुद्धा रोज करता का ड्राय शॅम्पू वापर? मग होऊ शकते हे मोठे नुकसान
Skin Care Tips | चेहर्यावर रोज लावा बेसन आणि मध, या समस्यांपासून होईल सुटका