पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | एक भरधाव कंटेनर उतारावरील वळणावर उलटला आणि घसरत जाऊन दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली. आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास लोणावळ्यात झालेल्या या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर (Old Mumbai Pune Highway) लोणावळा आणि खंडाळादरम्यान हॉटेल मयूर समोरील वळणावर हा अपघात घडला. अपघातात (Pune Accident News) ३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सुद्धा एका लहान मुलाचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. विशेष म्हणजे लोणावळा शहरातून जाणाऱ्या
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर बंदी असताना सुद्धा हा कंटेनर पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने जात होता.
कंटेनर लोणावळा शहरातून थोडा पुढे गेल्यानंतर उतारावरील वळणावर तो पलटी झाला. कंटेनर घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडकला. या अपघातात (Pune Accident News) दुचाकीवरील एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुल आणि दोघेजण जखमी झाले.
लोणावळा शहरातून अवजड वाहनांना बंदी असतानाही हा कंटेनर चालक जुन्या मार्गावर आल्याने नागरिक संतप्त
झाले आहेत. कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात आहे.
- MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकरांच्या आरोपाने खळबळ, ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा?
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…
- Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..
- Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…