बहुजननामा ऑनलाईन – पुणे ग्रामीण पोलीस दलातील बड्या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी त्यांना पकडले असून, कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशांत भुजबळ आणि कृष्णदेव पाबळे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील तक्रार यांच्याकडे त्यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानुसार काही वेळापूर्वी त्यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
दरम्यान यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.