पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अर्थशात्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून डॉ. विलास आढाव यांची नियक्ती झाली. ते अगोदर प्रौढ व निरंतर शिक्षण विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते विभागामध्ये कार्यरत असताना सुद्धा समाजाच्या जडणघडीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. बहुजन समाज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, व छ. शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित समाज हवा या तळमळीने ते गावपातळीपासून ते शहरीभागामध्ये झोपडपट्टीमध्ये ते विविध पातळीवर जाऊन प्रोबोधनाचे कार्य करतात.
त्यांचे बहुजन चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांचा विविध दलित साहित्य संमेलनांमध्ये सहभाग असतो. त्यांच्या नियक्तीमुळे सर्व महाराष्ट्रामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.