नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावत आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यात लॉकडाऊन शिथिल होण्यास सुरुवात होत आहे. यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) देशावासियांना काय संबोधित करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे.
Prime Minister Narendra Modi to address the nation at 5 PM today, 7th June. pic.twitter.com/722gehNL6a
— ANI (@ANI) June 7, 2021
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशावासियांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत सांगितलं आहे. मात्र, पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्यावर देशाशी बोलणार आहे असं ट्विटमध्ये उल्लेख केलेला नाही.
या दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.
अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय.
तसेच कोरोना मृत्यूचे प्रमाण देखील आटोक्यात आले आहे.
मात्र, अद्याप अनेक राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेलं नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबलं आहे.
तसेच कोरोनाने झालेलं नुकसान, औषध, तिसऱ्या लाटेवरुन घ्यावयाची काळजी. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृपया हे देखील वाचा:
NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली – ‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’
‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली लग्नगाठ !
कोरेगाव भीमात शासकीय नियम तुडविले पायदळी ! कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत विना मास्क कार्यक्रम