बहुजननामा ऑनलाइन – Prashant Nakti | मराठी संगीत विश्वात ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या संगीतकार ‘प्रशांत नाकती’ने दर्जेदार मराठी गाणी बनवत मराठी गाण्यांना भारतातच नव्हे तर परदेशात पोहोचवलं. त्यांची सर्वच गाणी प्रदर्शित होताच काही सेकंदात सोशल मीडियावर ट्रेंडींग होतात. नुकतंच ‘प्रशांत नाकती’ आणि ‘प्रिया गोसावी’ यांचा सुंदर विवाहसोहळा मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जवळपास २०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Prashant Nakti)
या विवाहसोहळ्यासाठी विनायक माळी (Vinayak Mali), गायक हर्षवर्धन वावरे (Harshavardhan Wavare), गायक रवींद्र खोमणे (Ravindra Khomne), गायक केवल वाळंज (Keval Walanj), गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane), संगीतकार कुणाल करण (Composer Kunal Karan) , विशाल फाले (Vishal Phale), नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार अश्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Prashant Nakti)
विशेष म्हणजे प्रशांत नाकतीने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात.
सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’,
‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान
व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.
आता लग्नानंतर प्रशांतचं नवीन गाणं कोणतं असेल यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांतच्या लग्नाचं एक सुंदर ओरिजनल गाणं देखिल लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर, या नव्या गाण्याची चर्चा होत आहे.
Web Title : Prashant Nakti | Famous Musician ‘Prashant Nakti’ got married with Priya, photos shared on Social Media
- Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ – मोहन जोशी
- Pune Crime News | पुणे शहरातील झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून एकाच वेळी 12 गुन्हेगार तडीपार (हद्दपार)
- Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात
- MP Dr. Amol Kolhe | ‘मी पुन्हा येईल असं म्हणायची हल्ली भीती वाटते’, अमोल कोल्हेंचा टोला; शिरुरच्या उमेदवारीबाबत म्हणाले… (व्हिडिओ)