Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले..

Prakash Ambedkar | prakash ambedkars press conference reaction on alliance with thackeray group

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानाला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची देखील भेट घेतली. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) माध्यमांशी संवाद साधत भेटीची प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

जे भाजपसोबत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही जाण्याचा विषय येत नाही. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे शिंदे गटासोबतच्या युतीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. आम्ही महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जाण्यासाठी उत्सुक आहोत. त्यामुळे त्यांच्यात आम्हाला कोणी सामावून घेत आहे का, याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मला भेटून गेले. पण शिवसेनेकडून अद्याप आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांची माझ्याशी चर्चा झाली. काँग्रेस एकटी लढणार आहे, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. त्यामुळे आघाडी म्हणून एकत्र बोलणार आहात की वंचित बहुजन आघाडीशी प्रत्येक घटक वेगवेगळी चर्चा करणार आहात, हे त्यांनी स्पष्ट करावे. अजूनपर्यंत महाविकास आघाडीतील घटकांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
यांनी युतीसाठी प्रस्ताव दिला होता. त्यामुळे आगामी काळात ठाकरे – आंबेडकर एकत्र येण्याची शक्यता आहे.
त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar)
भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. पण आंबेडकरांनी शिंदे गटासोबत जाणार नाही,
असे स्पष्ट केले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत.
यावेळी युतीची चर्चा होऊ शकते. त्यामुळे सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Prakash Ambedkar | vanchit bahujan aghad prakash ambedkar on alliance with maha vikas aghadi or shinde bjp maharashtra politics

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा

Aditya Roy Kapur | ‘आशिकी -२’ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर हॉट कलाकारांपैकी एक

Jitendra Awhad | ‘माझ्यावरील गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना नाकी नऊ येईल’ – आ. जितेंद्र आव्हाड