मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. आता त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे तो भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. प्रभास येत्या काळात ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात तो भगवान श्री राम यांची भूमिका साकारणार आहे.
Rebel Star #Prabhas bought a brand new @Lamborghini Aventador S Roadster ✨ pic.twitter.com/RLJ3ImSKc6
— Prabhas (@PrabhasRaju) March 28, 2021
प्रभासला अभिनयासोबतच त्याला गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या अनेक गाड्या आहेत. दरम्यान, या कलेक्शनमध्ये आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. तब्बल सहा कोटींची ही गाडी त्यानं रस्त्यांवर पळवली होती त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्रभासनं अलिकडेच लॅम्बॉर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही गाडी खरेदी केली. या गाडीची किंमत भारतात तब्बल सहा कोटी रुपये इतकी आहे. या स्पोर्ट्स कारचे फोटो प्रभासच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत.
#Prabhas First Ride on New Lamborghini
— Prabhas Trends™ (@TrendsPrabhas) March 28, 2021
खरं तर ही कार प्रभासनं आपल्या वडिलांसाठी खरेदी केली होती. २०१० साली त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी त्यांना लॅम्बॉर्गिनी चालवण्याची फारच इच्छा होती. परंतु, आर्थिक समस्येमुळं त्यांना ती कार खरेदी करता आली नाही. परंतु, १० वर्षानंतर आज प्रभास सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळं त्यानं वडिलांच्या स्मरणार्थ ही गाडी खरेदी केली. ही गाडी प्रभासनं अलिकडेच रस्त्यांवर देखील चालवली होती. या गाडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत लाखो चाहत्यांनी ही गाडी पाहून प्रभासवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.