उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – Pornography | उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील एका अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्या साहाय्याने अश्लील व्हिडिओच्या (Pornography) माध्यमातून ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. UP मधील सचिवालय सेवेचे विशेष सचिव दर्जाचे अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. पॉर्न व्हिडिओ (Porn videos) सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर सचिवालयातील विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह (R.V.Singh) यांनी याला षडयंत्र म्हटलंय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह (R.V.Singh) सचिवालय कक्षातच महिलेसोबत ऑनलाईन अश्लील कृत्य करताना दिसताहेत.
हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडिओ रितिक शर्मा नावाच्या तरुणाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आयडीवरून आर. व्ही. सिंह (R.V.Singh) यांच्या वॉलवर शेअर केला गेला आहे.
दरम्यान शेअर केल्यानंतर दोघांचेही फेसबुक खाते बंद झाले आहे.
अशा या प्रकरणात जाळ्यात सापडलेले सचिवांनी सोमवारी याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे (Cyber Crime Branch) तक्रार केली होती.
मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
आर.व्ही.सिंह म्हणतात की, त्यांच्याविरुद्ध कोणाकडून काही षडयंत्र रचण्यात आले आहे.
त्यांना यात गोवण्यात आले आहे. फसवून हा व्हिडिओ तयार करण्यात आले आहे.
असं सचिव सिह यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांना व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जात आहे.
या दरम्यान, काही काळापूर्वी ते सचिवालयात काम करत होते.
त्याचवेळी एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) सामाजिक कार्यकर्ता म्हणून आली.
बऱ्याच स्थानिक पत्रकारांचा देखील संबंधित मुलीच्या प्रोफाईलमध्ये फ्रेण्ड म्हणून सहभाग होता.
म्हणून त्या मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली.
यानंतर त्या आयडीवरून काही लिंक पाठवल्या गेल्या.
तर, या दरम्यान त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलाय, नंतर तो व्हायरल झाला आहे.
Web Title : Pornography | special secretarys pornographic video goes viral catastrophic scene captured camera
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update