मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Dies In Accident | मुंबई पोलिस दलातून (Mumbai Police) एक दुखःद
बातमी समोर आली आहे. भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे (Mumbai Crime News). ही घटना शुक्रवारी
सकाळी सांताक्रूझ (Santacruz) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली आहे. पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याने पोलिस दलावर
शोककळा पसरली आहे. (Police Inspector Dies In Accident)
प्रविण अशोक दिनकर PI Pravin Ashok Dinkar असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (Marine Drive Police Station) कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याकडे सांताक्रूझ परिसरातील पश्चिम द्रुतगती महार्गावरून जात होते. त्यावेळी भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यू झाला आहे. दिनकर हे दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (Police Inspector Dies In Accident)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिस निरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भरधाव बसच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रविण अशोक दिनकर यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
Web Title :- Police Inspector Dies In Accident | Mumbai Police Inspector Pravin Ashok Dinkar died in a collision with a speeding bus
हे देखील वाचा :
Pune Cantonment Board | दिलासादायक ! आजपासून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये टोल वसुली बंद
Pune Crime News | …म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन, हडपसरच्या काळेपडळमधील घटना