नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – नांदेड मधील पोलीस अधिक्षक कार्यलय मध्ये दंगल नियंत्रण पथक विभाग मध्ये कामावर कार्यरत असलेले पोलीस QRT camando maharashtra police राजू (गंगाधर) गणेश सूर्यवंशी रा.कौठा ता जिल्हा नांदेड मूळ पत्ता लामकानी ता भोकर जि नांदेड यांचा दि २६ जून २०१९ रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान अपघात घडला.
हा अपघात श्री कृष्ण मंदिर च्या समोर घडला आहे .ह्या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत कारण अरुंद व गड्डेमय रास्ता असल्याने अनेकांना ह्या रोडवर आपला प्राण गमवावा लागत आहे. ज्या वेळी राजू सूर्यवंशी यांच्या गाडीला अपघात झाला त्या वेळी राजू सूर्यवंशी (पोलीस जवान) यांच्या सोबत असलेले राजू यांचे मित्र माधव पांडगळे रा.तामसा ता.हदगाव जि.नांदेड यांना जब्बर मार लागल्याने जखमी झाले.
हा अपघात एवढा भिषण होता की एक दंगल नियंत्रक पोलीस विभागाच्या एका पोलिसास जीव गमवावा लागला त्या वेळी माल वाहू ऑटो मधील दोघे जण देखील जखमी झाले आहेत सध्या यांच्यावर ग्रामीण रुग्णालय,भोकर व नांदेड मध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहे.माल वाहू (ऑटो) मध्ये दोघे बाप व मुलगा जखमी झाले ते मूल रहिवासी हळदा येथील असून ते डोंगरे कुटुंबातील आहेत.
अपघाती मृत्यू झालेले पोलीस राजू सूर्यवंशी यांची भोकर शहरात व तालुक्यात असलेले मित्र मंडळी ,पोलीस स्टेशन
यांच्यात शोककळा पसरली आहे. ह्या प्रकरणी गुन्हा दाखल कोणावरही झालेला नसून केवळ याचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस स्टेशन जमादार कारामुंगे,कृष्णा तलवारे हे करीत आहेत.