मानवत : बहुजननामा ऑनलाईन – Police Accident News | नॅशनल हायवेवर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलिस कर्मचार्याचा मृत्यू झाला (Parbhani Crime News). ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथील स्वामी समर्थ जिनिंग समोर घडली आहे. (Police Accident News)
सुधाकर रामकिशन कणके (52) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. कणके हे परभणी पोलिस मुख्यालयात (Parbhani Police) हवालदार म्हणून कार्यरत होते. सध्या ते पाथरी येथे रहावयास होते. मंगळवारी रात्री ते परभणी येथुन पाथरीकडे मोटारसायलवरून जात असताना शहराबाहेरील स्वामी समर्थ जिनिंग समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ते धडकले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुधाकर कणके यांचे भाऊ सुरेश कणके यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Title :- Police Accident News | parbhani policeman dies after motorcycle collides with stationary truck near Manwath
हे देखील वाचा :