पुणे : बहुजननामा ऑनलाईन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोचं उद्घाटन केलं. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या Pune Municipal Corporation Election (PMC Elections) पार्श्वभूमीवर होत असलेल्या या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला. ‘मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन (Metro Project) माझ्या हस्ते झाले होते आणि आता उद्घाटनही माझ्या हस्ते झाले. मात्र यापूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण कधी होणार हे कळत नव्हते’ असा टोला मोदींनी लगावला. (PM Modi Visit To Pune)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मास ट्रान्सपोर्ट (Mass Transport) ही काळाची गरज आहे. त्यामुळे सरकारचा मेट्रो प्रकल्पांवर भर आहे. महाराष्ट्रातही मेट्रो प्रकल्पांची (Maharashtra Metro Project) निर्मिती व विस्तार होत आहे. आपण कितीही मोठे असलो तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवासाची सवय लावून घ्यावी. जितका प्रवास मेट्रोने कराल तितकीच शहराला मदत होईल, असेही आवाहन त्यांनी केलं. तसेच ग्रीन ट्रान्सपोर्ट (Green Transport), स्मार्ट मोबिलिटीवर (Smart Mobility) आमचा भर आहे. रेरा कायद्यामुळे (Rera Act) नागरिकांना सुरक्षित व्यवहाराची खात्री झाल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं. (PM Modi Visit To Pune)
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री (CM) असताना या प्रकल्पासंदर्भातील कामासाठी दिल्लीत येत होते.
या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मी त्यांचे अभिनंदन करतो.
कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळात मेट्रो सेवा सुरु झाल्याचे मोदींनी म्हटले.
पुणेकरांनी नदी महोत्सव साजरा करावा
मोदी पुढे म्हणाले, पुणे शहरातील मुळा (Mula River), मुठा नदी (Mutha River) प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1100 कोटी रुपयांचा प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच पुणेकरांनी दरवर्षी नदी उत्सव (River Festival) साजरा करावा, त्यामुळे लोकांना नदीचे महत्त्व समजेल, असेही ते म्हणाले.
Web Title :- PM Modi Visit To Pune | inauguration of pune metro prime minister narendra modi criticizes congress ncp
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gluten Free Diet | ग्लूटेन-फ्री डाएट सुरू करताय का?, तर अगोदर जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान !
Gold Price | सोन्याची जोरदार वाटचाल, मे 2021 नंतर दिसून आली सर्वात मोठी साप्ताहिक तेजी