नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान योजनेचा ८ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १ एप्रिलपासून म्हणजेच, ११,६६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होत आहेत. वास्तविक आजपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ८ वा हप्ता सुरु होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी सहा हजार रुपये हस्तांतरित करते. हजार रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. जर तुम्हीही या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर ते तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता.
दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिलला
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत मोदी सरकार दर वर्षी शेतकऱ्यांना ६००० रुपये २०००, २००० चे तीन हप्ते देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते १ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर या वेळेत तर तिसरा हप्ता १ डिसेंबर ते १ मार्च या कालावधीत येतो.
यादीमध्ये तुमचे नाव याप्रमाणे पहा
१) सर्वात आधी तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
२) या होमपेजवर तुम्हाला ”Farmers Corner” चा पर्याय दिसेल.
३) Farmers Corner च्या आत तुम्हाला ”Beneficiaries List” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
४) त्यानंतर तुम्हाला तिथल्या यादीत राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक, गाव सिलेक्ट करावे लागेल.
५) त्यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांना पूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
‘असे’ माहिती केले जाऊ शकते तुमच्या हप्त्याची स्थिती
वेबसाईटवर पोहचल्यावर उजव्या बाजूला असलेल्या Farmers Corner वर क्लिक करा. यानंतर Beneficiary Status ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेट्सची संपूर्ण माहिती मिळेल. PM किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्ही घर बसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी आपल्याकडे आपले शेती खाते, आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.nic.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.
असे करू शकता रजिस्ट्रेशन
>> त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जावा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmar Registration’ हा पर्याय निवडावा लागेल.
>> त्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबत कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा आणि पुन्हा प्रोसेसला पुढे चालवा.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व वयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> तसेच बँक खात्याचा तपशील आणि शेतमालाशी संबंधित माहिती भरावी लागेल.
>> यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता.