पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले असून शनिवारी पुण्याचा पारा १३.३ अंश होता.त्यामुळे पुणेकरांना गारठा अनुभवयास मिळाला असून गेल्या १० वर्षांत दुसऱ्यांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नीचांकी थंडी अनुभवली.
मुंबई आणि उपराजधानी नागपुरातील तापमान अनुक्रमे १३.३ आणि १३.७ अंशाखाली आले होते. तर चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११.५ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानातही घट होऊ लागली आहे. पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.