पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – १० वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवून झाडामागे नेऊन तिच्यावर ६८ वर्षाच्या नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सावन गंगाराम डोळस (वय ६८, रा. फुलेनगर, भोसरी) याला अटक केली आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी या मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची १० वर्षाच्या मुलीला सावन डोळस याने चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. तिला ओम चेंबर्सच्या पाठीमागील झाडामागे नेले. तेथे तिचे कपडे काढून शारीरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. व तिला मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती या मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली होती.