बहुजननामा ऑनलाइन टीम – उसने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघाने तरुणावर कोयत्याने व लोखंडी रॉडने वार करुन गंभीर जखमी केले.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न(murder with a scythe) केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.
विकास संभाजी तनपुरे आणि सागर संभाजी नलावडे (दोघे रा़ वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी विशाल प्रकाश देवकर (वय २६, रा.देवकरवाडी, घोटवडे, ता.मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.विशाल देवकर यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे.आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत.माण रोडवरील बापुजीबुवा घाटातील विठ्ठल मंदिरासमोरील वळणावर २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ते भेटले होते.त्यावेळी विकास याने त्यांच्याकडे उसने पैसे मागितले.त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर या दोघांनी व त्यांच्या दोन मित्रांनी देवकर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.विकास व सागर यांनी लोखंडी रॉड डोक्यात मारुन तसेच कोयत्याने पायावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले.त्यांच्यापासून स्वत:ची सोडवणूक करत देवकर हे घरी गेल्यावर चौघेही त्यांच्या मागोमाग घरात शिरले.घरातील कपाट तोडून बाहेर असलेल्या स्वीफ्ट कारचे नुकसान करुन निघून गेले़ स्वत: वर उपचार करुन त्यानंतर देवकर यांनी फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.