बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेची अस्तित्वात असलेली कोविड केअर सेंटर (सीसीसी) खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. तसेच ही दीर्घकालीन लढाई विचारात घेता महापालिकेने कोविड केअर सेंटर चालवण्यासाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशा तीन विभागात वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसार सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, खासगी रुग्णालये, संघटना वैद्यकीय संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यामधून पात्र संस्थांची निवड करण्यात आली.
पालिकेने विकेंद्रीकर करण्याचा निर्णय घेतलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक मात्र काहीच लक्षणे नाहीत, अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातील. खासगी संस्थांकडून दर मागवल्यानंतर प्रस्ताव करण्यात आला होता. तो स्थायी समितीच्या मागील बैठकीत तहकूब ठेवण्यात आला. सदस्यांनी माहिती मागवल्यानंतर त्यांचे समाधान झाले. म्हणून प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे जम्बो रुग्णालयांसाठी पुरेसे मनुष्यबळ होणार, असल्याचा दावा केला आहे. खासगी संस्थेने डॉक्टर्स, नर्स सोबत मनुष्यबळ पुरवायचे आहे. त्यानुसार एका बेडला दिवसाला किती दर देण्यात दिला जाईल, असा तपशील मंजूर करण्यात आला.
संस्थेचे नाव – ठिकाण – बेडसंख्या
१. ट्रस्ट हेल्थ केअर – रावेत – ४००
२. आयकॉन रुग्णालय – घरकुल वसाहत – ८००
३. डिवाईन रुग्णालय – घरकुल वसाहत – ४००
४. डॉ भिसे रुग्णालय – महाळुंगे – ८००
५. रुबी अलकेअर – महाळुंगे – ६००
६. बीव्हीजी इंडिया – बालेवाडी, आकुर्डी -५००