पिंपरी / पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1005 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 हजार 289 इतकी झाली आहे. महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1005 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 हजार 289 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेले रुग्ण हे शहरातील असून आज हद्दीबाहेरील एकही रुग्ण आढळून आला नाही. शहराबाहेरील 863 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 24 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1117 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 909 तर शहराबाहेरील 208 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 24 रुग्णांमध्ये 18 रुग्ण हे मनपा हद्दीतील आहेत तर 6 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.
शहरामध्ये सध्या 6 हजार 110 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 295 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज शहरात 891 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 44 हजार 668 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात गेल्या 24 तासात चिंचवड, भोसरी, बौद्धनगर, काळेवाडी, गांधीनगर, प्राधिकरण, यमुनानगर, वाकड, चिखली, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी, निगडी, थेरगाव, येरवडा, कोल्हापूर, मुळशी, बिवेवाडी, चाकण, दौंड येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.