मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय तेलांच्या किमतींचा देशातील तेलांच्या किमतीवर फरक पडतो. सध्या आंतरराष्ट्रीय कमॉडिटी खनिज तेल स्वस्त झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात कपात केली. तसेच चीनमधील कोरोना व्हायरसचा देखील कमोडिटी बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गुरुवारी पेट्रोलमध्ये २३ ते २५ पैसे तर डिझेल २२ ते २४ पैशांची कपात केली. मागील १७ दिवसात पेट्रोल २ रुपये ४४ पैसे आणि डिझेल २ रुपये ७० पैशांनी स्वस्त झाले आहे.
महत्वाच्या शहरातील दर
मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ७८.९७ रुपये तर डिझेलचा दर ६९.५६ रुपये झाला आहे. नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७३.३६ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६६.३६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७६.१९ रुपये आणि डिझेल ७०.०९ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७५.९९ रुपये असून डिझेल ६८.७२ रुपये आहे.
चीनमुळे खनिज तेलाच्या उलाढालींवर परिणाम
चीनमधील ‘कोरोना’ विषाणूमुळे खनिज तेलाच्या उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचा ऑक्टोबरनंतरचा हा नीचांकी स्तर आहे. ऑक्टोबरमध्ये खनिज तेल ५२.१५ डाॅलरपर्यंत खाली घसरले होते. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील घसरण कायम आहे. गुरुवारी खनिज तेलाच्या किमतीत २४ सेंट्सची घट झाली. खनिज तेलाचा भाव ५९.५७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कपात कायम ठेवली आहे. १२ जानेवारीपासून पेट्रोल दरात घसरण सुरु आहे.