बहुजननामा ऑनलाइन टीम – थंडीत जास्त वयाच्या लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. लकवा आणि हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे वाढली आहेत. डॉक्टरांनुसार, याचे कारण आहे थंडीमुळे धमण्या आकुंचन पावल्याने उच्च रक्तदाब वाढणे. अशावेळी डॉक्टर जास्त वयाच्या लोकांना थंडीपासून रक्षण करण्याचा सल्ला देत आहेत. डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान अशा रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गोरखपुर जिल्हा हॉस्पीटल आणि बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दररोज असे 15 ते 20 रूग्ण पोहचत आहेत.
जिल्हा हॉस्पीटलचे फिजिशियन डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, जर जास्त वयाच्या लोकांना (50 वषापेक्षा जास्त) उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर औषधाचे नियमित सेवन करावे. कारण हवामान बदलाचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. या कारणामुळे अनेक लोकांना ब्लड प्रेशरसह इतर आजार होत आहेत. जिल्हा हॉस्पीटलमध्ये रोज लकवा आणि हार्टअटॅकचे पाच ते सात रूग्ण येत आहेत.
ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी राहावे सावध
डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे. बीपीच्या रूग्णांनी नियमित औषध सेवन करावे. मीठ, मसाल्यांचे सेवन कमी करावे. अंड्याचा आतील भाग खाऊ नये. नियमित ब्लड प्रेशर तपासत राहा. बाहेर पडताना गरम कपडे घाला.
ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब जा डॉक्टरांकडे
* 50 वर्ष किंवा त्यापेक्षा वयाच्या लोकांमध्ये बेशुद्ध पडणे
* चक्कर येऊन पडणे
* कमजोरी जाणवणे
* डोक्याच्या एका भागात दुखणे
* कमरेत वेदना जाणवे
* हातांमध्ये मुंग्या येणे