बहुजननामा ऑनलाईन – नव्या कागदपत्रांवरून हे सिद्ध झाले आहे की, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने इशारा देऊनही पाकिस्तान दहशतवादी गटांचे समर्थन करत आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये एफएटीएफ पाकिस्तानच्या पावलांचे पुनरावलोकन करत आहे. यापूर्वी या गोष्टीचे ठोस पुरावे समोर येत आहेत की, पाकिस्तान सतत दहशतवादाला समर्थन देत आहे आणि दहशतवादी हालचालींसाठी आर्थिक मदत करत आहे.
युनायटेड जिहादी कौन्सिलचा हेड आहे सलाहुद्दीन
सुरक्षा एजन्सीजद्वारे मिळवलेल्या एका कागदपत्रावरून समजले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआय भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी हिज्बुल मुजाहिद्दीनचा वापर करत आहे. या दहशतवादी संघटनेचा प्रमुख यूसुफ शाह आहे, जो सैयद सलाहुद्दीन या नावाने सुद्धा ओळखला जातो. सलाहुद्दीन युनायटेड जिहाद कौन्सिल (युजेसी) चा हेड सुद्धा आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दशहतवादी नेटवर्कची सामुहिक संघटना आहे आणि पाकिस्तानच्या निर्देशावर काम करते.
6 मे 2020 रोजी भारतीय सुरक्षा एजन्सीने सैयद सलाहुद्दीनची दोन मुले सैयद शकील यूसुफ आणि सैयद शहीद यूसुफ यांना अटक केली आहे, तसेच त्याचे दोन साथीदार रियाज नायकू आणि आदिल अहमद यांना ठार केले आहे. यानंतर सलाहुद्दीन हादरला आहे आणि भारतावर सूड उगवण्याच्या प्रयत्नात आहे. दहशतवादी सैयद सलाहुद्दीन भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी जेकेएआरटी (जम्मू अँड काश्मीर अफेक्टीज रिलिफ ट्रस्ट) नावाची संघटना तयार केली आहे. या संघटनेचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवणे आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केला जातो. तिचे मुख्यालय रावळपिंडीत आहे आणि तिच्या शाखा इस्लामाबाद, मुजफ्फराबाद आणि अन्य शहरात आहेत.
भारताला हाती लागले पत्र
भारतीय सुरक्षा एजन्सीच्या हाती एक पत्र लागले आहे. यामध्ये स्पष्ट लिहिले आहेक की, दहशतवादी सैयद सलाहुद्दीन गुप्तचर महासंचालनालयाचा अधिकारी आहे आणि तो आयएसआयसाठी काम करत आहे.
सलाहुद्दीनची सिक्युरिटी तपासणी ’क्लियर’ आहे
पत्रात हे सुद्धा म्हटले आहे की, त्याची सर्व सिक्युरिटी तपासणी ’क्लियर’ आहे आणि त्यास विनाकारण ठिकठिकाणी अडवू नये. हे पत्र 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध आहे. या पत्रात त्याच्याद्वारे वापरात असलेल्या कारचा सुद्धा उल्लेख आहे.
ऑक्टोबरमध्ये एफएटीएफची बैठक
या वर्षी जेव्हा ऑक्टोबरमध्ये एफएटीएफची बैठक होईल तेव्हा पाकिस्तान पर्दाफाश करण्यासाठी हे पत्र महत्वाची भूमिका बजावू शकते.