उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – Osmanabad Crime News | मुलगा सतत दारू पिऊन आई-वडिलांनाच ठार मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी वडिलांनी पोटच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केला आहे. रामराजे सतीश बारकुल असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना येरमाळ्यात गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तर संशयित आरोपी वडील सतीश बारकुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Osmanabad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मृत रामराजे बारकुल हे येरमाळा येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. रामराजे हा व्यसनाच्या आहारी गेलेला आणि रोज तो मद्यपान करून आई-वडिलांस ठार मारण्याची धमकी देत असे. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याने घरी जाऊन आईला ठार मारण्याची धमकी दिली आणि नंतर झोपण्यासाठी शेताकडे निघून गेला. रामराजेच्या या प्रकाराला वडील सतीश बारकुल हे फारच वैतागले होते. (Osmanabad Crime News)
शेवटी या प्रकरणाला कंटाळून वडील सतीश बारकुल यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता
नेहमीप्रमाणे शेताकडे गेल्यावर मुलगा रामराजे आणि त्यांच्यात शेती नावावर करून द्या म्हणून झटापट झाली.
या झटापटीत रामराजे खाली पडला यानंतर आरोपी सतीश बारकुल यांनी त्याचा चेहरा ठेचून त्याचा खून केला.
या प्रकरणी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Osmanabad Crime News | osmanabad murder of son by father
हे देखील वाचा :
WTC Final | इंदूर कसोटीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक
Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना