बहुजननामा ऑनलाईन टीम : Oppo A15s भारतात लाँच झाला यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल आणि किंमत १२ हजारांपेक्षा कमी आहे. हँडसेट निर्माता कंपनी oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A15s भारतात लाँच केला आहे. स्मार्टफोनची रचना oppoA15 प्रमाणेच आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Oppo A15sची किंमत आणि फोनच्या सर्व वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्या..
Oppo A15s ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,४९० रुपये आहे. या फोनमध्ये डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि सिल्वर तीन रंग उपलब्ध आहेत. Oppo A15s फोनची विक्री २१ डिसेंबरपासून ॲमेझॉनवर होईल.
१)सॉफ्टवेयर अँड डिस्प्ले_
Oppo A15s स्मार्टफोन कलरओएस ७.२ वर कार्य करते. या oppo स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८९ टक्के आहे.
२)प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज_
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, मीडियाटेक हीलियो पी ३५ ऑक्टा – कोअर प्रोसेसरमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे.
३)कॅमेरा_
फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, एक १३-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, २-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि २-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
४)कनेक्टिव्हिटी_
फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस इ. समाविष्ट आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
५)बॅटरी क्षमता_
४,२३० एमएएच बॅटरी क्षमता आहे.