नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मागील काही दिवसापासून इंधनाचे दर वाढत असल्यामुळे राजकरणात चर्चेला उधाण आलं आहे. तर यावरून पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची संघटना (OPEC) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुढील भविष्यामध्ये पेट्रोलच्या किमती शंभरच्या पुढे जातील असा अंदाज वर्तविला होता. मात्र आता अमेरिका देशाच्या दबावानंतर OPEC देशांनी तेलाचे उत्पादन वाढण्यास सहमती दर्शवली आहे. आता मे महिन्यापासून उत्पादन वाढणार आहे. यावरून आता पुढील काही दिवसात इंधनाच्या किंमती कमी होणार आहेत.
कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षी तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यानंतर OPEC देशांनी उत्पादन कमी करण्याचं ठरवलं होत. तर २०२० च्या डिसेंबर ,महिन्यामध्ये या संघटनेने त्यांच्या उत्पादनामध्ये जवळजवळ ५० हजार बॅरेलच्या अतिरिक्त उत्पादनाची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सौदी अरबने आपल्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात १० लाख बॅरेलची कपात केली होती. तसेच, सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत ३ ऱ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा चीन आणि जपान हे २ देश इंधन आयात करतात. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करत आहे.
दरम्यान, अमेरिका आणि भारत इंधनाच्या वाढत्या दरासंदर्भात अनेक वेळा OPEC देशांना विनंती करत होते. परंतु, OPEC देश या विनंतीकडे दुर्लक्ष करत असल्याने पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे इंधनाच्या किंमती अधिक वाढल्या होत्या. यावरूनही राजकारण चांगलेच रंगू लागले होते. तर तेलाच्या वाढत्या दराबाबत अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सौदी अरबशी यावर आणखी एकदा विचार करण्यास सांगितल्याने OPEC देशांनी आता कच्चा तेलाचे उत्पादन वाढवण्यास होकार दर्शविला आहे.
OPEC तेल उत्पादक देश –
– इराक (Iraq)
– कुवैत (Kuwait)
– सौदी अरब (Saudi Arab)
– व्हेनेज्युएला (Venenjula)
– अझरबॅझान (Azarbazan)
– बहरीन (Bahrin)
– ब्रुनेई (Brunei)
– कझाकिस्तान (Kazakistan)
– मलेशिया (Malesia)
– मॅक्सिको (Mexico)
– ओमान (Oman)
– रशिया (Russia)
– दक्षिण सूडान (South Sudan)
– आणि सूडान (Sudan)