New Ration Card | नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज नाही, कागदपत्रांच्या नियमांत काही बदल; जाणून घ्या प्रक्रिया

Ration Cards | the government has issued a new registration facility for issuing ration cards how to apply

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – New Ration Card | रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या (New Ration Card) माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते.

तर काही ठिकाणी आयडी प्रूफ (ID Proof) म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातोय. पण, नवीन रेशन कार्ड काढण्यासाठीही काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहे.

आता नवीन रेशन कार्ड (New Ration Card) काढायचे असेल तर जातीच्या प्रमाणपत्राची (Caste certificates) काहीही गरज लागणार नाहीये. प्राधान्य आणि अंत्योदय योजनेअंतर्गत अनुक्रमे 24 लाख 91 हजार 851 आणि 2 लाख 19 हजार 308 लाभार्थी आहेत. त्यांना सध्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळतोय.

दरम्यान, रेशन कार्ड ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणूनही वापरता येते. नवीन गॅस कनेक्शन (LPG Gas Connection), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence), बँक खाते उघडणे, सिम कार्ड (Sim Card) मिळवणे ते मतदार ओळखपत्रासाठी रेशन कार्ड आवश्यक असतं.

नवीन रेशन कार्डसाठी कागदपत्रे –
कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो, जुने रेशन कार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, कुटुंब प्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स, संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स, सदस्यांचा जन्माचा दाखला (Birth Certificate), उत्पन्नाच्या दाखला (Income Proof Certificate), लाइट बिल (Electricity Bill), पॅन कार्ड (PAN Card) आणि मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आदी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

दरम्यान, रेशन कार्ड तयार करायचे असेल तर काही नियमांत बदल केले आहेत.
मात्र, त्यामध्ये जातीचा दाखला जोडावा लागणार अशी काही अट टाकलेली नाही.
त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (District Supply Officer Surekha Mane) यांनी सांगितलं आहे.

Web Title :- New Ration Card | no need caste certificate new ration card

Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Gold Price Today | सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव