लॉस एंजलिस : संशोधकांनी सूती कपड्याचा पुनर्वापर करता येणारा मास्क विकसित केला आहे, जो एका तासात सूर्याच्या प्रकाशात राहिल्यास 99.99 टक्के जीवाणु आणि व्हायरसला मारू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांनी बनणारे मास्क खोकताना आणि शिंकताना निघणार्या सूक्ष्म कणांना रोखतात, ज्यामुळे कोविड-19सह अन्य आजराच्या प्रसार होण्यास मदत मिळू शकते. एसीएस अप्लाइड मटेरियल अँड इंटरफेसेज जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, मास्कवर लागलेले जीवाणु आणि व्हायरस संसर्गजन्य असू शकतात.
अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी एक नवीन सूती कपडा विकसित केला आहे, जो सूर्याच्या प्रकाशात आल्यानंतर प्रतिक्रियाशील ऑक्सीजन स्पायजेस (आरओएस) सोडतो, जो कपड्यावर लागलेल्या सूक्ष्म विषाणुंना मारतो आणि तो धुण्यायोग्य, पुनर्वापर योग्य आणि लावण्यासाठी सुरक्षित असतो. त्यांनी सांगितले की, दुपारच्या जेवणाच्या वेळी सूर्याच्या प्रकाशात आपला मास्क ठेवून जीवणूमुक्त करू शकता.
या खास कपड्याने बनला आहे मास्क
टीमला आढळले की, बंगाल डायद्वारे तयार कपडा फोटोसॅनेटायजर प्रमाणे सूर्यप्रकाशात आल्यानंतर एका तासात त्यावर लागलेले 99.99 प्रतिशत जीवाणु मारतो आणि 30 मिनिटांच्या आत टी7 बॅक्टरियाफॅजला 99.99 टक्के सक्रिय करतो. टी7 बॅक्टरियाफॅजबाबत मानले जाते की, हा व्हायरस काहीसा कोरोना व्हायरसच्या तुलनेत आरओएससाठी जास्त प्रतिबंधक आहे.
तर एका अन्य रिसर्चमध्ये समोर आले की, कोरोनाचा दिर्घकालीन प्रभाव असतो. वैज्ञानिकांनी अमेरिकेत 1,600 पेक्षा जास्त कोविड-19 रूग्णांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर आढळले की, आजाराचा दिर्घकालिन प्रभाव राहातो. संशोधकांमध्ये अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे संशोधकसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी मिशिगनच्या 38 हॉस्पीटलमध्ये दाखल 1,648 कोविड-19 रूग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले आणि आढळले की, त्यांच्यापैकी 398 जणांचा हॉस्पीटलमध्ये दाखल असताना मृत्यू झाला तर 1,250 बचावले. हे संशोधन एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहे.