पिंपरी / पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. एखाद्या 25 वर्षांच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना (central Government) आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात एका कार्यक्रमात बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, सध्याची लोकशाही फार बदलेली आहे. आजच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा पक्ष विरोधात बसतो. या लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. होत्याच नव्हतं, नव्हत्याचं होतं ही म्हण ऐकत होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत ज्याचं होतं त्याचं नव्हतं, कसं झालं आणि ज्याचं नव्हतं, त्याचं कसं झालं हे शरद पवारांनी दाखवून दिल्याचे मुंडे म्हणाले.
श्रवणाखाली देण्याची तरतूद पाहिजे
दिल्लीतसुद्धा श्रवणयंत्र देण्याची गरज आहे. ज्या वेळेस यंत्र देऊनसुद्धा श्रवण काम करत नसेल, तेव्हा श्रवणाखाली देण्याची तरतूद असली पाहिजे. जिथं मशीन काम करू शकत नाही, तिथं हाताने काम करता आलं पाहिजे.
ही ‘ईडी’च भाजपला संपवणार
प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्यावर ‘ईडी’ने (ED) लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं (BJP) चाललेलं आहे. ही ‘ईडी’च त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.