Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
निलेश सर्वेदे हा वाशी गावातील एका इमारतीत भाड्याच्या खोलीत आपल्या पुतण्यासोबत राहत होता. तो हाऊसकिपिंगचे काम करत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी निलेशचा पुतण्या घराच्या बाहेर गेला होता. यावेळी निलेश घरामध्ये एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत निलेशने आपल्या आयुष्याचा शेवट केला. मानखुर्द येथे राहणारा निलेशचा भाऊ दिनेश हा त्याच्या मोबाईलवर सतत कॉल करत होता. मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याला संशय आला यानंतर तो आपल्या भावाला पहाण्यासाठी वाशी गाव येथे आला तेव्हा निलेश घरातील किचनमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. (Navi Mumbai Crime News)
या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला.
यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना निलेशने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी
सापडली असून त्यात त्याने त्याच्या सोबत राहण्यास असलेल्या व त्याला सोडून गेलेल्या महिलेचा उल्लेख केला आहे.
त्यामुळे निलेशने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Web Title :- Navi Mumbai Crime News | navi mumbai man ends life after nephew leaves home note before death mentions lady who left
हे देखील वाचा :
Ind Vs Aus Test | उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे संघात पुनरागमन
Pune Crime News | रागीट स्वभावामुळे नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करुन दिली लग्न करण्याची धमकी
Manjiri Oak | प्रसाद ओकला वाढदिवसानिमित्त पत्नीने दिले खास सरप्राईज; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल