Nashik Police News | पोलीस उपायुक्त (DCP) व सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांची तडकाफडकी बदली

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Police News | नाशिक शहरातील परिमंडळ दोनमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये (Nashik Crime News) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून ओरड होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांवर दबाव असून, पोलीस आयुक्तांनी प्रशासकीय कारण देत पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांची तडकाफडकी बदली (Transfers) केली आहे. (Nashik Police News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (DCP Chandrakant Khandvi) आणि सहायक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे (ACP Ambadas Bhusare) यांची बदली केली आहे. तर उपायुक्तपदी मोनिका राऊत (DCP Monica Raut) आणि सहायक पोलीस आयुक्तपदी आनंदा वाघ (ACP Ananda Wagh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी दिले आहेत. (Nashik Police News)
नाशिक शहरातील अंबड (Ambad Police Stations), नाशिकरोड (Nashik Road Police Stations), उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड, जळपोळ, मारामारी, घरफोडी, एटीएम सेंटरमध्ये चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडले आहे. गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील 12 पोलिसांसह गुन्हे शाखेतील (Crime Branch) दोन व अंबडमधील एका पोलिसाची दंगल नियंत्रण पथकात (Riot Control Squad) बदली केली आहे.
दरम्यान, सोमवारी (दि.24) मध्यरात्री विहितगाव येथे दोन जणांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड केल्याने कायदा
व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला होता. यातच पालकमंत्री दादा भुसे
(Guardian Minister Dada Bhuse) यांनी नराजी व्यक्त करत गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा असे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची पोलीस मुख्यालयात (Headquarters) बदली केली. तर मुख्यालयातील मोनिका राऊत यांची परिमंडळ दोन येथे बदली केली.
तसेच सहायक पोलीस आयुक्त भुसारे यांची विशेष शाखेत (Special Branch) बदली केली असून,
विशेष शाखेतील आनंदा वाघ यांची नाशिकरोड विभागात बदली केली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
असे असले तरी शहरात गुन्हेगारांवर अंकुश नसल्याने या बदल्या झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
Web Title : Nashik Police News | hasty transfer of deputy commissioner of police dcp and assistant commissioner of police acp
हे देखील वाचा
Comments are closed.