मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Narayan Rane Arrested । राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात आज सकाळपासूनच अनेक जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक होताना दिसले. अनेक ठिकाणी आंदोलने आणि काही ठिकाणी भाजप (BJP) कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली. राणेंना संगमेश्वर येथून रत्नागिरी पोलिसांनी (Ratnagiri Police) अटक (Narayan Rane Arrested) केली आहे. अटक झाल्यानंतर नारायण राणेंनी एका मुलाखती दरम्यान पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अटक होताना काय घडामोडी घडल्या याबाबत राणेंनी सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरे बाबत प्रश्न विचारण्यात आला असता राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले नारायण राणे?
एका मुलाखती दरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला असता त्यावेळी बोलताना राणे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,” असं उत्तर त्यांनी दिलं आहे. ‘उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?”, असं मुलाखती दरम्यान विचारणा केली असता राणेंनी “कुछ नही कहुंगा, असं म्हणत एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन, असं उत्तर दिलं आहे.
पुढे बोलताना राणेंनी (Union Minister Narayan Rane) म्हटलं की, ‘ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत.
अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजकरणामध्ये आहोत.
असे देखील नारायण राणेंनी म्हटलं आहे. मुलाखती दरम्यान बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी 3 सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे DCP आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं.
मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती.
त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस (Sangameshwar Police) स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि 2 तास बाहेर आले नाहीत.
मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या.
नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जातंय.
दरम्यान, पुढे त्यावेळी राणे यांना तुम्ही ते वादग्रस्त विधान करुन चूक केली असं वाटतंय का?, असं विचारलं असता त्यावेळी नारायण राणेंनी म्हटलं की, ‘मी कानाखाली मारेल असं म्हणालो नव्हतो.
हा कितवा 15 ऑगस्ट आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं हे चुकीचं असल्याचं म्हटलं.
त्यांनी सेक्रेट्रीला विचारावं हे चूक असल्याचं मी म्हटलं होतं.
आधीच त्यांनी वाचून यायला हवं होतं असं मत मी मांडलेल. तसेच मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती असं म्हणालो होतो.
असे नारायण राणेंनी म्हटलं आहे.
Web Title : Narayan Rane Arrested | narayan rane vs shivsena first comment of bjp leader after arrest
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BJP leader Prasad Lad | ‘नारायण राणेंच्या जीवाला धोका – प्रसाद लाड