Nandurbar Police | वर्दीतील देवमाणूस – म्हसावद पोलिसांचा मनोरुग्ण महिलेला मदतीचा हाथ, वर्दीनं घडवली कुटुंबासोबत भेट

Pune Crime News | Assistant Police Inspector threatened in court to withdraw rape case

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन Nandurbar Police | शाहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या (Mhasavad Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे एका अनोळखी मनोरुग्ण (Psychopath) महिलेची तिच्या कुटुंबाची भेट झाली. म्हसावद पोलिसांनी मनोरुग्ण महिलेबाबत सहृदयता दाखवत तिला कुटुंबीयांपर्यंत पोहोचते केले. वर्दीतील देवमाणूसच या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्याची चर्चा सध्या सुरु असून पोलिसांच्या (Nandurbar Police) या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

29 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांना एका गावच्या पोलीस पाटील यांना खेतिया ते शहादा रोडवर रायखेड गावाजवळ एक अनोळखी महिला मिळून आली असून, ती काहीच बोलत नसल्याची माहिती दिली. नंदुरबार जिल्हा (Nandurbar Police) पोलीस अधीक्षकांनी ही माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार (Police Inspector Nivritti Pawar) यांना देत कारवाईची सूचना केली होती. पोलीस निरीक्षक पवार यांनी महिलेचा शोध घेत तिची विचारपूस केली. मात्र तिचे बोलणे अस्पष्ट असल्याने माहिती मिळत नव्हती. महिलेला जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले.

 

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला तपासून ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या महिलेची ओळख पटवून तिला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात सुखरुपपणे देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक पवार यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना महिलेची माहिती देऊन ओळख पटवण्याचे आवाहन केले.

 

महिला मिळून आल्यापासून दोन दिवसांचा कालावधी उलटला होता. तरी देखील त्या महिलेची काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तसेच गुजरात (Gujarat) व मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्याची सिमा लागून असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग (Missing) किंवा अपहरण (kidnapping) झालेल्या महिलांबाबत माहिती घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. तरी देखील या महिलेबाबत काहीच माहिती मिळत नव्हती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मंगळवारी (दि.31 जानेवारी) महिलेला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या अंमलदारांनी महिलेची आपुलकीने विचारपूस केली.
त्यावेळी तिने अडखळत तिच्या गावाचे नाव सांगितले.
पोलिसांनी क्षणाचाही विलंबन न करता पोलीस पाटील व इतर नागरिकांशी संपर्क साधला.
त्यावेळी ही महिला त्याच गावची असून 29 जानेवारी रोजी सायंकाळी घरातून निघून गेल्याचे सांगितले.

 

पोलिसांनी तात्काळ तिच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
कुटुंबीयांनी महिलेला पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील व म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलिसांचे आभार व्यक्त केले.
ही कामगिरी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार चंदन बजरंगे, जितेंद्र पाडवी,
घनश्याम सूर्यवंशी, वर्षा पानपाटील, संगीता गावीत, पल्लवी चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nandurbar Police | Devamanus in Wardi – Mhasavad police helped a mentally ill woman, met her family in uniform Nandurbar Police News

 

हे देखील वाचा :

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Budget 2023 | शिवसेनेची ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर खरमरीत टीका