Nanded Accident News | मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 8 जखमी

Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – Nanded Accident News | नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात (Nanded Accident News) 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. जखमी व्यक्तींबाबत विचारपूस करुन त्यांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करुन देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांना सूचना दिल्या आहेत.

 

मृतांमध्ये ज्योती रमेश भोई (वय 32, रा. मेहकर), गालिअम्मा कल्याण भोई (वय- 35, रा.गेवराई), वेजल कल्याण भोई
(वय वर्ष 1, रा. गेवराई), पुंडलीक कोल्हाटकर (वय-70, रा. माळसावरगाव, ता. भोकर), तर दवाखान्यात नेताना वाटेत
विद्या संदेश हटकर (वय 37, रा. इजळी ता. मुदखेड) यांचा समावेश आहे.
चार मृतदेह शवविच्छेदनासाठी मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहेत.
तर अपघातातील (Nanded Accident News) गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील
उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

जखमीमध्ये लक्ष्मी राजू गोडमंचे (वय – 30), दिपा महेश गोडमंचे (वय – 20), पुजा गोडमंचे (वय – 40), सोहम हटकर (वय – 10),
सोनाक्षी हटकर (वय -13), शोभा भांगे (वय -35), शेख मोईद्दीन शेख जिम्मीसाब (वय 45), पल्लवी विजय शामराव (वय -30),
यांचा समावेश आहे.

 

 

Web Title :- Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

 

हे देखील वाचा :

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR