नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Suicide News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. कल्पना रवी पंडागळे आणि स्विटी या मायलेकींची नावे आहेत. (Nagpur Suicide News)
काय आहे नेमके प्रकरण?
कल्पना सोमवारी रात्री मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर आली. तिने तलावाच्या काठावर बसून मुलीला खाऊ घातले. त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल, शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायचा असेल तर सांग’, असा संदेश पाठवला आणि तिने मुलीला कडेवर घेऊन अंबाझरी तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. (Nagpur Suicide News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कल्पना तलावात उडी घेत असताना एका युवकाने तिला पहिले.
यानंतर त्याने तेथील नागरिकांना याची माहिती दिली. अंबाझरीचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांना या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक संतोष बोयणे यांना घटनास्थळी पाठवले.
संतोष बोयणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तलावाच्या काठावर एका चिठ्ठीत कल्पनाची आई, पती, आणि
भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवलेला आढळला.
यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंबाझरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Nagpur Suicide News | a suicide 28 year old woman jump in lake with a girl
हे देखील वाचा :