नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये गुरुवारी (दि. 10) सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
राज पांडे (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सूरज शाहू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे समजते. आरोपी सुरजने गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास राज याचे अपहरण केले होते. खंडणी म्हणून आरोपीने शोषण करणाऱ्या मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Coronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही
कॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला
उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क
10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद