मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने कोरोनाच्या संकटात मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्याची घोषणा केलीय. गेल्या कोरोनाच्या लाटेपासून अंबानी यांनी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तर आजही अशा कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. मुकेश अंबानी हे कर जमा करण्यात अग्रस्थानी आहेत.
उद्योजक मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता जवळपास ७३.३ अब्ज डॉलर्संपेक्षा अधिक आहे.अब्जाधीशांच्या क्रमवारीत मुकेश अंबानी सध्या १२ व्या स्थानी असून, नुकतीच मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. अशी माहिती ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सच्या वृत्तानुसार मिळाली आहे. गतवर्षी, रिलायन्सने पीएम केअर फंडात 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. भारताच्या अव्वल देणगीदारांच्या यादीत मुकेश अंबानी तिसर्या क्रमांकावर आहेत. हारून इंडियाच्या परोपकारी लोकांच्या यादीनुसार, २०१९-२० मध्ये अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ४५८ कोटींची देणगी दिली आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांची Reliance ही कंपनी देशातील सर्वाधिक जीएसटी आणि व्हॅट भरणा करणारी आहे. रिलायन्सने जीएसटी आणि व्हॅट रक्कम म्हणून ६९,३७२ इतके कोटी रुपये दिले आहेत. तर भारतातून सर्वाधिक रक्कम ह्या कंपनीची ठरली आहे. इतकेच नाही तर गतवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजने ८ हजार कोटींपेक्षा अधिक आयकर (Income tax) जमा केला होता. अशी माहिती मुकेश अंबानी यांनी गतवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४३ व्या वार्षिक सभेत दिली होती. त्यावेळी रिलायन्स समूहाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुंबईमध्ये १०० बेडचे सेंटर सुरू केले. यावरून कोरोना रुग्णांसाठी हे देशातील प्रथम समर्पित रुग्णालय आहे. असा दावा रिलायन्सने केला होता.