Mumbai Pune Express Highway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी नवीन उपाययोजना, अनेक संस्था एकत्र येऊन करणार काम

Mumbai Pune Express Highway | transport commissioner orders 24 hour vehicle inspection to prevent accidents on expressways pune print news

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयेजित करण्यात आली. या बैठकीत रस्ते सुरक्षा आणि राज्यातील विविध महामार्गांवर झालेल्या अपघातांच्या घटनांचा आढावा घेण्यात आला. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Express Highway) अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ( Mumbai Pune Express Highway) अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी, ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ (Save Life Foundation) आणि ‘ब्लूमबर्ग’ (Bloomberg) संस्थेकडून काम करण्यात येेत आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत रस्ते सुरक्षा तसेच उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. या संस्थेच्या प्रतिनिधींकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) झालेल्या अपघातांबद्दल सादरीकरण केले गेले. जास्त प्रमाणात अपघात हे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांची होतात अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

डिसेंबर महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर पुणे आणि पनवेल विभागाकडून विशेष
मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पोलिस, परिवहन विभाग तसेच (Regional Transport Office),
आयआरबीचे (IRB) पथक २४ तास गस्त घालणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या पथकांची संख्या तसेच
अन्य उपाययोजनांबाबत आराखडा करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २४ तास वाहनांची तपासणी
करण्यात येणार आहे, अशी माहिती भिमनवार यांनी बैठकीत दिले.

 

जास्त अपघात हे लोणावळ्याच्या घाटात उतरणाऱ्या वाहनाचे होतात,
अनेकदा अतिवेगाने गाडी चालविल्याने हे अपघात होतात, अशी माहिती भिमनवार यांनी बैठकीत दिली.
अपघात रोखण्यासाठी वाहनाचालकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. वाहतूक नियमांचे पालन करायला हवे,
असे आवाहन भिमनवार यांनी केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Mumbai Pune Express Highway | transport commissioner orders 24 hour vehicle inspection to prevent accidents on expressways pune print news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत अंगावर लोहरस पडून आठ कामगार जखमी

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा महिला मोर्चा मंत्रालयावर

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन