मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai High Court | अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Justice Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai Hig h Court) मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस (Recommend) केली होती. त्यावर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी (President) शिक्कामोर्तब करत तशी अधिसूचना जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका (Justice Ramesh Dhanuka) हे 30 मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
दरम्यान 6 जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud),
न्यायमूर्ती संजय कौल (Justice Sanjay Kaul) आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna)
यांच्या न्यायवृंदाने न्या. देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
Web Title : Mumbai High Court | justice devendra upadhyay appointed as a new chief justice of bombay high court
हे देखील वाचा
- Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले
- EPFO Interest Rate | कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! PF वरील व्याज दर वाढवला
- ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे
- Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक