मुंबई बहुजननामा : मुंबईतील रेडलाईट परिसर म्हणून चर्चित असणारा कमाठीपुरा सोडून अनेक सेक्स वर्कर अन्य भागात जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट यांचा वाढत्या भाव आणि कमी उत्पन्न यामुळे या सेक्स वर्क करणाऱ्या महिलांना दुसऱ्या परिसरात जावे लागत आहेत. एका सेक्स वर्कर महिलेने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक महिला मुंबई सोडून अन्य उपनगरांत जात आहे. आरती नावाच्या सेक्स वर्कर ने सांगितल्याप्रमाणे कमाठीपुरामध्ये पोट भरणे मुश्किल झाले आहे, त्या आता ठाण्याच्या कदावली मध्ये राहत आहेत, त्यांना लांबचा पल्ला गाठून कमाठीपुरामध्ये यावे लागते. त्यांनी सांगितले कि, भाडे वाढले आहेत, परंतु त्यांचे उत्पन्न देखील कमी झाले आहे. त्यांना आपल्या कुटुंबाची देखभाल करावी लागते, आणि यासाठी त्यांची कमाई ही कमी पडते.
एका सेक्स वर्कर ने सांगितले कि, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अन्य महिला सध्या कदावली, कल्याण, आणि आसपासच्या परिसरात राहावे लागत आहे. सोशल एक्टिविटीज इंटिग्रेशन नावाच्या एनजिओ चे डायरेक्टर विनय वस्त यांच्या म्हणण्यानुसार , “कामाठीपुरा मध्ये कमी उत्पन्न मिळणाऱ्या सेक्स वर्कर राहतात , त्यांना तिथले खोली भाडे परवडण्या जोगे नाही , त्यामुळे त्यांना नालासोपारा , तुर्भे आणि वाशी सारख्या ठिकाणी राहावे लागत आहे. विनय हे १९९० पासून सेक्स वर्कर सोबत काम करत आहेत. परंतु २० वर्षांपासून भाडे वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या १५००० रुपये एवढे भाडे द्यावे लागत आहे. कमाठीपुरा हा मुंबईतील मध्यवर्ती परिसर असल्याने तसेच आसपासच्या वाढत्या व्यापारी जागांमुळे इथे भाडे वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात रिअल इस्टेट वाल्यांची नजर देखील आहे .”
सेक्स वर्कर मुद्द्यावर काम करणाऱ्या अभिनेते जे ब्रान्डन हिल यांनी सांगितले कि, “ही अत्यंत वाईट गोष्ट आहे कि, भाडे वाढीमुळे त्यांना दुसऱ्या भागांत जावे लागत आहेत. त्यांनी सांगितले कि, येणाऱ्या काळात ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा आहे. ” कमाठीपुरा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा रेडलाईट एरिया आहे. जवळजवळ २५ वर्षांपूर्वी येथे ५०००० सेक्स वर्कर काम करत होत्या. परंतु सध्या त्याच्या संख्येत घट होत आहे.