नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) तयार केलेल्या एका अॅपच्या आधारे तुम्ही हरवलेला फोन किंवा चोरीस गेलेला फोन पुन्हा मिळवू शकता. मोदी सरकारमध्ये (Modi Government) टेलीकॉम मंत्री असलेले रविशंकर प्रसादने यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एक वेब पोर्टल लाँच केले होते. या वेब पोर्टलद्वारे तुम्ही चोरी झालेल्या फोनची तक्रार दाखल करू शकता. हा प्रोजेक्ट सुरूवातीला केवळ महाराष्ट्रासाठी होता परंतु मोदी सरकारने आश्वासन दिले होते की लवकरच तो संपूर्ण देशात लागू केला जाईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फोन चारीला गेला असेल तर त्यासाठी एक FIR फाईल करावा लागेल. यानंतर हेल्पलाइन नंबर 14422 द्वारे टेलीकॉम डिपार्टमेंटला माहिती द्यावी लागेल. पोलिसात तक्रार दाखल करताच, टेलिकॉम डिपार्टमेंट तुमच्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करेल.
यानंतर कुणीही कोणत्याही मोबाइल नेटवर्कवर फोनचा वापर करू शकणार नाही. टेलीकॉम डिपार्टमेंटने 2017 च्या जुलै महिन्यात C-DoT को मोबाइल ट्रॅकिंग प्रोजेक्ट सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजे CEIR सापवले होते. CEIR आयएमईआय नंबर्सचा डेटाबेस आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर चा उद्देश मोबाइलच्या चोरीला प्रतिबंध लावणे होता. CEIR सेट-अप लावण्यासाठी मोदी सरकारने 15 कोटी रुपये मंजूर केले होते.
सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सिस्टम फोन चोरीला गेल्यानंतर फोनमधील सर्व सेवा ब्लॉक करतो.
जर चोराने तुमच्या फोनमध्ये नवीन सिम लावले तरीसुद्धा काहीही उपयोग होणार नाही.
IMEI नंबर बदलूनही काहीही उपयोग होणार नाही.
Web Titel :- Modi Government | modi government had launched a web portal which will help finding your lost phone
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED ची धाड