ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – MMRDC News | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MMRDC) शहरे विकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या देखरेखीत ठाणे आणि बोरिवलीला जोडणारा एक भूमिगत रस्ता (Thane to Borivali under ground way) बनवण्याची योजना आखली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या योजनेचा अंदाजित खर्च 11235.43 कोटी रूपये आहे. ठाणे-बोरिवलीला जोडणार्या या दुहेरी भुयारी मार्गावरून वेगवान प्रवास होईल, सोबतच घोडबंदर रोडवरील सध्याची वाहतूक कमी होईल.
मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली 10.25 किलोमीटर लांबीचे दोन-तीन भुयारी मार्गांसह 11.5 किलोमीटर लांब कनेक्टिंग रोड असेल, जो ठाण्यात टिकुजी वाडी ते बोरिवलीमध्ये पश्चिम एक्सप्रेसवे पर्यंत जाईल.
हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार असल्याने एमएसआरडीसीने येथील जीवसृष्टी
आणि हरितसृष्टीला त्रास होऊ नये म्हणून भुयार खोदण्याच्या मशीनने भुयार खोदताना विशेष
काळजी घेतली आहे.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत 16.54 हेक्टर खासगी जमीन
आणि 40.46 हेक्टर जमीनीचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे. मार्च 2022 मध्ये सुरू
होणारी ही योजना पूर्ण होण्यास साडेपाच वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Web Title : mmrdc trip from thane to borivali will just be 15 minutes away
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 276 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
PM Kisan | कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, नववा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार