पुणे : बहुजननामा ऑनलाईन – MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी हा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देणे योग्य आहे. अन्यथा पोलीस बनावट चकमकीत त्याला मारुन टाकतील, असा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. (MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case)
ससून हॉस्पिटलमधून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ससून रुग्णालयातील एक शिपाई हा आरोपी ललित पाटील आणि एका मंत्र्यांमधील दुवा होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी यावेळी केली. (MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case)
ड्रग्स माफिया ललित पाटील याची पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली जात होती.
पाटील ससूनमधून अंमली पदार्थांची विक्री करत होता. पोलिसांची त्याला साथ असल्याने हा प्रकार झाला आहे.
त्यामुळे याचा केंद्रीय यंत्रणेमार्फत तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणात सरकारमधील तीन मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा असून, तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. या सर्व प्रकारात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या भोवतीही संशयाची सुई फिरत असून, त्यांच्या दूरध्वनीची तपासणी झाली पाहिजे, असेही धंगेकर म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा
- Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु
- Pune Crime News | दांडिया खेळताना दांडी लागल्याने धारदार शस्त्राने वार, धायरी येथील घटना; 3 सराईत गुन्हेगारांना अटक