Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

Menstrual Pain Home Remedies | know the best tips to get rid of menstrual pain

बहुजननामा ऑनलाईन टीम – Menstrual Pain Home Remedies | महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी (Menstruation Period) येते. मासिक पाळी म्हणजे महिलांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. सामान्यत: 21 ते 35 दिवसांमध्ये मासिक पाळी येत असते. मासिक पाळी दरम्यान वैज्ञानिकदृष्ट्या महिलांच्या शरीरामध्ये ही एक हार्मोनल प्रक्रिया असते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक दुखण्याला (Menstrual Pain Home Remedies) सामोरे जावे लागते. काही महिलांना कमी प्रमाणात त्रास होतो, तर कित्येक महिलांना मासिक पाळी दरम्यान प्रचंड अशा वेदनेला (Menstrual Pain Home Remedies) सहन करावं लागतं.

मासिक पाळी दरम्यान पोट दुखी (Abdominal Pain), पाठ दुखी (Back Pain), कंबर दुखी आणि शारीरिक दुखणे (Body Pain) यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या दुखण्यामुळे महिलांना उठण्यापासून ते बसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातात. दुखणं कमी होण्यासाठी महिला गरम पाण्याचा शेक घेतात. तसेच अनेक घरगुती उपाय करतात ज्याणे दुखणं कमी होण्यास मदत होईल. आपण देखील अजून काही उपाय जाणून घेऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला मासिक पाळीतील (Menstrual Pain Home Remedies) दुखणं कमी होण्यास मदत होईल.

डॉक्टर अंजली कुमार यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना मासिक पाळीत वेदनांच्या तक्रारी जास्त असतील तर वेदनाशामक औषधांचा वापर करू शकतात.

वेदना कमी करण्यासाठी ईबुप्रोफेन आणि कॉम्बिफ्लेम यांसारख्या गोळ्या वापरल्या जाऊ शकतात. तसेच डॉक्टरांनी म्हणाले, तुम्ही खुर्चीवर बसून काम करत असाल आणि तुम्हाला दुखण्यामुळं त्रास होत असेल, तर तुम्ही श्वासाचे व्यायाम करा. श्वास घ्या आणि श्वास सोडा, या व्यायामामुळे तुम्हाला मनापासून आराम मिळेल.

महिलांना अत्यंत वेदना होत असेल तर, त्यांनी मासिक पाळीच्या काळात आवर्जून कोमट पाणी प्यायला हवा. कोमट पाणी प्यायल्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच ज्या पदार्थामध्ये चरबीयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कार्बोनेटेड, कॅफीन आणि खारट पदार्थ शक्यतो टाळावे.

या काळात वेदना टाळण्यासाठी महिलांनी मेफटाल पास या गोळीचा देखील वापर करू शकता. मात्र लक्षात ठेवा ही गोळी फक्त वेदना होत असतानाच घ्यावी. इतर वेळी घेऊ नये.

या काळात दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी योगासने अत्यंत प्रभावशाली आहेत. योगा आपल्या शरीरासाठी चांगला असतो. तसेच मासिक पाळीच्या काळात वेदना कमी करण्यासाठी प्राणायाम आणि श्वासोच्छवास व्यायाम उत्कृष्ट मानले जातात. तसेच योगामुळे शरीराला फायदा होतोच. परंतु मानसिक मनस्थिती सुद्धा सुधारते.

Web Title :- Menstrual Pain Home Remedies | know the best tips to get rid of menstrual pain

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Gold Price Today | रू. 47,600 झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या चांदीचा काय आहे दर

Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत चांगल्या व्याजासह मिळते करात सवलत, जाणून घ्या सविस्तर