नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मलेशियामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोर्टाने एका व्यक्तीला वॉशिंग मशीन ड्रायरमध्ये गर्भवती मांजरीची हत्या केल्याबद्दल ३४ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. यासह सुमारे सात लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. मलेशियातील सरकारी वृत्तसंस्था बर्नामा यांच्या म्हणण्यानुसार कोर्टाने के. गणेश नावाच्या व्यक्तीला प्राणी संरक्षण कायदा तोडल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.
कोर्ट गणेश यांना शिक्षा ठोठवतांना म्हणाले की, पुढील कोणत्याही व्यक्तीने प्राण्यांवर असे अत्याचार करू नये, म्हणून आरोपीला ३४ महिने तुरूंग आणि सात लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गणेश सध्या जामिनवर बाहेर आहे. या प्रकरणाबाबत आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गणेश यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला जामिनवर सोडण्यात आले आहे. ही घटना २०१८ ची आहे, त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मांजरीची हत्या उघडकीस आली होती.
फुटेजमध्ये, गणेश त्याच्या एका साथीदारासह ड्रायरमध्ये मांजरला टाकतांना दिसले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेला प्रथम घटनेची माहिती मिळाली. जेव्हा तिने ड्रायरचा वापर केला. तिला आत एक मांजरीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली.
Visit : bahujannama.com