ब्राझिल : वृत्तसंस्था – एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चर्चशी संबंधित एका ग्रुप लिडरवर 240 महिलांना सेक्स स्लेव्ह बनवल्याचा कथित आरोप आहे. आरोपीने अनेक महिलांना अनोळखी आणि जनावरांशी सेक्स करण्यास भाग पाडलं आहे. उत्तर पूर्व ब्राझीलधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी रोनी स्केल्ब नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
रिपोर्टनुसार, रोनी रोल्स रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काम करत होता. मुरिए नावाच्या चर्चशीही तो स्वयंसेवक म्हणून जोडला गेला होता. मिनॅस गेरॅसच्या सिव्हील पोलिसांनी सांगितले की, “आरोपीने 4 वर्षांपर्यंत 11 राज्यातील महिलांचे शोषण केले आहे.” तपास करणाऱ्या प्रमुखाने सांगितले की, “32 वर्षीय आरोपीने सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर अनेक फेक प्रोफाईल बनवल्या होत्या. या प्रोफाईलच्या माध्यमातून तो महिलांच्या संपर्कात आला होता. सदर आरोपी महिलांना इंटिमेट व्हिडीओ आणि फोटोंसाठी पावणे दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवायचा. न्यूड फोटो पाठवल्यानंतर मात्र तो महिलांना बँक ट्रान्सफरची नकली रिसीट पाठवायचा. यानंतर हे फूटेज नातेवाईकांना पाठवण्याबद्दल त्यांना धमक्या द्यायचा.”
महिलांना धमकी देत तो आणखी व्हिडीओ आणि फोटोंची मागणी करायचा. एका महिलेने सांगितले की, तिला एका दिवसात 20 वेळा तसल्या फोटोंची मागणी करण्यात आली. अनेक महिलांना भेटायला बोलवत त्याने रेपही केला. काही महिलांना तर अनोळखी लोकांशी आणि जनावरांशी संबंध बनवण्यास भाग पाडले. काही महिलांना तर त्याने सेक्स कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासही भाग पाडलं. यात लिहिलं होतं की, महिला त्याला त्यांच्यासोबत काहीही करण्यास परवानगी देत आहेत.” फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे सिनेमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टमध्ये असेही म्हटले होते की, तो महिलेला जेवढं जोरात हवं तेवढ्या जोरात मारू शकतो. आरोपी स्केल्बला 11 ऑक्टोबर रोजी बेलो होरिजान्तो मधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
Visit : bahujannama.com