बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसला अनेक जण फॉलो करतात. सध्या तिचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. त्यात आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे वेगवेगळे खुलासे करताना दिसते. त्यातच या शोचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि त्यात मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खान हा आपल्या आईबद्दल एक तक्रार करताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या या शोच्या प्रोमोमध्ये अरहान खान हा देखील आपल्या आईच्या या शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून समाविष्ट झाला आहे. त्यात त्याने आपली मावशी अमृता अरोरा आणि या शोची होस्ट असलेली त्याची आई अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यासोबत चांगल्याच गप्पा मारल्या आहेत. पण याच गप्पांदरम्यान त्याने आपली आई अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिची खिल्ली उडवली आहे.
अराहान म्हणाला, ‘अमू म्हणजेच अभिनेत्री (अमृता अरोरा) माझ्या दुसऱ्या आईसारखी आहे. पण मला आता ती आईपेक्षाही जवळ असल्यासारखी वाटत आहे.’ त्यानंतर अरहान हसत हसत म्हणाला की तो मस्करी करत आहे.
तसेच त्याने या संवादादरम्यान मलायकाची (Malaika Arora) पोशाखावरून खिल्ली देखील उडवली आहे.
हे बोलताना अरहान खूप आनंदी मूडमध्ये दिसत आहे.
त्याने त्याच्या आणि त्याच्या आईमधील एक समान गोष्ट उघड केली ती म्हणजे तो आणि त्याची आई मलायका
हे दोघेही त्यांच्या आई-बाबांची मोठी मुले आहेत. मलायकाने (Malaika Arora) परिधान केलेल्या ड्रेसची
तुलना अरहानने टेबल नॅपकिनशी केली. अरहान म्हणाला, तु सध्या तुरूंगातील कैद्याप्रमाणे दिसत आहे.
त्यावर मलायका निरूत्तर झाली. ती फक्त हसतचं राहिली.
दरम्यान अरहान खान हा त्याची मावशी अमृता अरोरा हिच्या खूप जवळ असून तो तिला आपली दुसरी आईचं मानतो.
अरहान खान हा मलायका (Malaika Arora) अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा आहे.
दरम्यान अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला असला तरी देखील या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध चांगले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Malaika Arora | malaika arora son arhaan khan show moving with malaika troll her said you look like prison
हे देखील वाचा :