मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Rain | काल राज्यात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाच्या स्वागताला पावसाने देखील हजेरी लावली. मागच्या 48 तासात राज्यात उकाडा वाढल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली. आज (दि.1) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) विजा, मेघगर्जना वादळी वाऱ्यासह (Thunderstorm) पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वळीव स्वरुपाचा पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. याठिकाणी 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज संध्याकाळी गणपती विसर्जन:
कृपया IMD अपडेट्स पाहा,विशेषत: दुपार नंतर, IMD द्वारे पुढील 3,4 तासांसाठी जारी करण्यात येणारे इशारे
IMD GFS मॉडेल मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवते.मुंबई ढगाळ
घाट भागात अधिक शक्यता pic.twitter.com/lGxUDv0qdF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2022
दरम्यान राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर,
औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपर, भंडारा, गोंदिया,
गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Rain | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain
हे देखील वाचा :