Maharashtra Politics News | ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत गृह खात्याचा मोठा निर्णय, ‘मातोश्री’वरील सुरक्षा कमी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. (Maharashtra Politics News) अशातच आता गृह खात्याने (Home Ministry) ठाकरे कुटुंब (Thackeray Family) आणि मातोश्रीच्या (Matoshree) सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना Z+ सुरक्षा (Z+ Security) होती. मात्र आता ती Y करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे. (Maharashtra Politics News) याशिवाय एस्कॉर्ट व्हॅनसह मातोश्रीवरील सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे.
गृह खात्याकडून अचानक ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
परंतु या सर्वांनाच कमी करुन पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी कमी केली असून पायलटही कमी केला आहे. याशिवाय मातोश्रीवर असलेल्या SRPF ची सुरक्षा देखील काढून टाकली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे यांच्या Z + सुरक्षेमध्ये एक बुलेट फ्रुफ कार, एक पोलीस निरीक्षक (PI),
दोन सहायक पोलीस निरीक्षक (API), दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI), दोन एस्कॉर्ट वाहन (Escort vehicle)
त्यामध्ये 6 कॉन्स्टेबल आणि कोणत्याही वेळी 10 इतर कॉन्स्टेबल सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होत होते.
Web Title : Maharashtra Politics News | uddhav thackeray family and his residence matoshree security has been reduced by maharashtra government
Comments are closed.